प्रश्न १ ला अ ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. १. इ. स.१४४० मध्ये __________ याने छापखाना सुरू केला. अ. होमर ब. जेम्स वॅट क. गुटेनबर्ग ड. ॲरिस्टॉटल २. वास्को-द-गामा हा ________ या देशाचा दर्यावर्दी होता. अ. पोर्तुगाल ब. इंग्लंड. क. फ्रान्स. ड. पोलंड ३. मराठ्यांनी पोर्तुगीजांना ______ च्या वेढ्यात पराभूत केले. अ. वेंगुर्ला. ब. फोंडा. क. सुरत. ड. राजापूर
४. गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी ______ यांच्या प्रयत्नामुळे सती प्रथा निर्मूलनाचा कायदा पास केला अ. डॉ.भांडारकर ब. महात्मा फुले क. स्वामी दयानंद सरस्वती ड. राजा राममोहन रॉय
५. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने पहिला अणुबॉम्ब ________ या शहरावर टाकला. अ. हिरोशिमा ब. नागासाकी क. पर्ल हार्बर ड. स्टॅलिनग्राड
६. सार्क संघटनेचे संघटनेचे मुख्यालय _______ येथे आहे. अ. थायलंड ब. जकार्ता क. काठमांडू ड. दिल्ली
ब. पुढील प्रत्येक संचातील ‘ ब ‘ गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. (०४) १. ‘अ’ गट. ‘ब’ गट 1. फर्डिनांड मॅगेलन - भारतात आलेला पहिला दर्यावर्दी. 2. सॅम्युएल डी शँपलेन.- उत्तर अमेरिकेत फ्रेंच वसाहती स्थापन करणारा. 3. कॅप्टन जेम्स कुक - न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया जिंकणारा इंग्लंडचा सेनानी. 4. द बोगनविले - पॅसिफिक महासागर पार करून ‘ताहिती येथे पोहोचलेला दर्यावर्दी दुरुस्त जोडी -. फर्डिनांड मॅगेलन - पृथ्वी प्रदक्षिणेला निघालेला पहिला प्रवासी.
२. ‘अ’ गट. ‘ब’ गट 1. वखार - मालाच्या साठवणुकीचे ठिकाण 2. कार्ताझ - परवान्याचा दस्तऐवज 3. फॅक्टर्स. - वखारीत काम करणारे नोकर 4. टाकसाळ. - जिंकून घेतलेला प्रदेश
दुरुस्त जोडी - 4. टाकसाळ - छपाईखाना
३. ‘अ’ गट. ‘ब’ गट 1. कास्मो-द- ग्वार्द - पोर्तुगीज इतिहासकार 2. गोंसालू मार्तीस - पोर्तुगीज वकील 3. फ्रांस्वां मार्टिन. - डज वखारीचा प्रमुख 4. हेन्री रेव्हीग्टन. - इंग्रज अधिकारी दुरुस्त जोडी - फ्रांस्वां मार्टिन -पॉडीचेरीचा गव्हर्नर जनरल
४. ‘अ’ गट. ‘ब’ गट 1. हैदराबाद संस्थानचे विलीनीकरण - स्वामी रामानंद तीर्थ 2. काश्मीर संस्थानचा राजा - शेख अब्दुल्ला 3. गोवा मुक्ती लढ्यातील मोलाचे योगदान - मोहन रानडे 4. पुदुचेरी येथील कामगार नेते. - व्ही. सुबैया
दुरुस्त जोडी - काश्मीर संस्थानचा राजा - हरीसिंग
प्रश्न २ रा - अ ) ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना यासंबंधीची नावे लिहा. (०४) १. ‘वराहमिहिर’ यांनी लिहिलेला ग्रंथ - उत्तर -. बृहत्संहिता
२. भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय - उत्तर - पोर्तुगीज ३. पहिल्या महायुद्धातील जर्मनी,ऑस्ट्रिया, हंगेरी, तुर्कस्तान,बल्गेरिया या राष्ट्रांचा गट - उत्तर -. अक्षराष्ट्र
४. दुसऱ्या महायुद्धानंतर सोयीएट रशिया किंवा अमेरिका यांच्या गटात सामील न होण्याचे भारताचे धोरण - उत्तर - अलिप्ततावाद
ब. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. (०४) १. ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी अकराव्या शतकात वेळोवेळी धर्मयुद्ध केली कारण - अ. त्यांना आपल्या धर्माचे वर्चस्व प्रस्थापित करायचे होते. ब. इस्लाम धर्मियांनी त्यांच्याविरुद्ध सतत आक्रमणे केली होती. क. ख्रिश्चन धर्मियांसाठी पवित्र असणारी जेरुसलेम व बेथेलहॅम ही शहरे इस्लामी सत्ताधीशांना परत मिळवायची होती. ड. व्हेनिस व जेनेवा ही शहरे इस्लामी सत्ताधीशांकडून त्यांना जिंकायची होती. २. गॅलिलिओला “आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक” म्हटले जाते कारण - अ. त्याने प्रथमच मोठी दुर्बीण तयार केली होती. ब. त्याने आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा शोध लावला. क. त्याने निरीक्षण करणे व सिद्धांत तर्कशुद्ध पद्धत रूढ केली. ड. त्याने आधुनिक प्रायोगिक विज्ञानावर मोठा ग्रंथ लिहिला होता.
३. काही संस्थाने वगळता बहुसंख्य संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली कारण - अ. या संस्थानिकांना तनखा दिला जाणार होता. ब. सरदार वल्लभ भाई पटेल यांनी मुत्सद्दीपनाने सर्वांना मान्य होईल असा सामीलनामा तयार केला होता. क.केंद्र सरकारने या संस्थानिकांना त्यांचे अधिकार अबाधित ठेवण्याचे आश्वासन दिले होते. ड. सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानिकांना संस्थान विलीन झाल्यास मोठे बक्षीस देण्याचे आश्वासन दिले होते.
४.अन्झुस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही कारण - अ. त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते. ब. हा लष्करी करार होता. क.हा गुप्त करार होता. ड. हा फक्त मित्र देशातील करार होता.
ब ) पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. (०५)  १. वास्को-द-गामा समुद्रमार्गे भारतात कोणत्या बंदरात उतरला. उत्तर - कालिकत बंदरामध्ये
२. मादागास्कर हे बेट कोणत्या महासागरात आहे. उत्तर - हिंदी महासागरामध्ये
३. फर्डीनंड मॅगेलन याने कोणकोणत्या महासागरातून प्रवास केला? कोणतेही एक नाव लिहा? उत्तर -. अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर आणि हिंदी महासागर
४. मेक्सिको हा देश कोणत्या खंडात आहे? उत्तर - उत्तर अमेरिका
५. या नकाशाच्या मदतीने कोणती माहिती मिळते? उत्तर -. सागरी सफरीचा मार्ग यांची माहिती
ब. दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. (कोणतेही ४). (०८) १. वसाहतवाद फोफावण्याची कारणे - १. औद्योगिक क्रांती २. कच्च्या मालाची गरज ३. खनिज साठे उपलब्ध झाले. ४. अतिरिक्त भांडवल
२. पुढील तक्ता पूर्ण करा. भारतातील शहरे. कोणत्या युरोपीय सत्तेचे स्थान (केंद्र) अ. गोवा. - पोर्तुगीज ब. कोलकाता - इंग्रज क.नागापट्टण. - डच ड. पुदुचेरी - फ्रेंच
३. मराठी सत्तेचा विस्तार - ठिकाण. -. तेथील सत्ता अ. नागपूर - भोसले ब. ग्वालियर -. शिंदे क.इंदोर -. होळकर ड. बडोदा -. गायकवाड
४. १८५७ च्या उठावातील नेते - अ. नानासाहेब पेशवे ब. तात्या टोपे क.झाशीची राणी लक्ष्मीबाई ड. मुघल बादशहा बहादुरशाह
५. गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्ते - 1. मोहन रानडे 2. शिरुभाऊ लिमये 3. सुधा जोशी 4. पंडित महादेवशास्त्री जोशी 5. केशवराव जेधे 6. ना. ग. गोरे 7. सेनापती बापट 8. जयंतराव टिळक
६. सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढण्याची कारणे - अ. केंद्र सरकारचे सॉफ्टवेअर क्षेत्राच्या विकासासाठीचे अनुकूल धोरण ब. उद्योजकांची दूरदृष्टी क. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचा भारतभर झालेला प्रसार ड. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारे कुशल संगणक अभियंते. |