रयत शिक्षण संस्थेचे,
महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उंब्रज. ता. कराड
घटक चाचणी परीक्षा क्र.१
आदर्श उत्तरपत्रिका
____________________________________________________
प्रश्न १ - अ) योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. (०७)
१. पुणे जिल्ह्यातील ............ हे ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहतीचे उदाहरण आहे.
अ) चिंचवड ब)इनामगाव क) स्वारगेट
उत्तर - पुणे जिल्ह्यातील इनामगाव हे ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहतीचे उदाहरण आहे.
२. भारताच्या पश्चिमेस ............. हा समुद्र आहे.
अ) अरबी समुद्र ब) बंगालचा उपसागर क) हिंदी महासागर
उत्तर - भारताच्या पश्चिमेस अरबी समुद्र हा समुद्र आहे.
३. इजिप्त या देशांमध्ये ............. या नदीचे खोरे आहे ?
अ) सिंधू ब)नाईल क) गोदावरी
उत्तर - इजिप्त या देशामध्ये नाईल या नदीचे खोरे आहे.
४............... येथील नवाश्मयुगीन लोकांनी अंजिराच्या झाडांची नियोजनपूर्वक लागवड केली होती.
अ) गिलगॅल ब) पॅरिस क) वॉशिंग्टन
उत्तर - गिलगॅल येथील नवाश्मयुगीन लोकांनी अंजीरांच्या झाडांची नियोजनपूर्वक लागवड केली होती.
५. चुकीचा पर्याय शोधा. (इजिप्त , चीन , भारत , इंग्लंड )
अ) इजिप्त ब) इंग्लंड क) भारत
उत्तर - चुकीचा पर्याय - ब ) इंग्लंड
६. "नवाश्मयुगीन क्रांती" असा शब्दप्रयोग ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञ ............ यांनी केला होता.
अ) गॅलिलिओ ब) ॲरिस्टॉटल क) गॉर्डन चाइल्ड
उत्तर - "नवाश्मयुगीन क्रांती" असा शब्दप्रयोग ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञ गॉर्डन चाइल्ड यांनी केला होता.
७. " यलो रिव्हर " हे ........... या नावाचे भाषांतर आहे.
अ) सिंधू ब) हो-यांग-हो क) गोदावरी
उत्तर - " यलो रिव्हर " हे हो-यांग-हो या नावाचे भाषांतर आहे.
____________________________________________________
ब) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (०८)
१. शेतीस प्रारंभ कोणत्या काळात झाला होता ?
उत्तर - शेतीस प्रारंभ नवाश्मयुगात झाला.
२. युफ्रेटीस व टायग्रीस या नदीकिनारी कोणती संस्कृती उदयाला आली होती ?
उत्तर - युफ्रेटीस व टायग्रीस या नदीकिनारी मेसोपोटेमिया संस्कृती उदयाला आली होती
३. सिंधू संस्कृतीतील आद्य शेतकऱ्यांनी कोणती पिके उत्पादित केली होती ?
उत्तर - सिंधू संस्कृतीतील आद्य शेतकऱ्यांनी बार्ली व गहू ही पिके उत्पादित केली होती
४. भारताच्या सिंधू नदीकिनारी कोणती संस्कृती उदयाला आली होती ?
उत्तर - भारताच्या सिंधू नदीकिनारी हडप्पा किंवा सिंधू संस्कृती उदयाला आली होती.
५. "हो-यांग-हो" या नदीला चीनमध्ये दिलेली कोणती दोन नावे आहेत ती लिहा ?
उत्तर - "हो-यांग-हो" या नदीला चीनमध्ये रिव्हर व मदर अशी नावे दिली होती.
६. "मेसोपोटेमिया" या शब्दाचा अर्थ काय आहे तो लिहा ?
उत्तर - मेसोपोटेमिया म्हणजे दोन नद्यांचा मधला प्रदेश होय.
७." चिनी संस्कृतीची जन्मदात्री" असे कोणास म्हणतात ?
उत्तर - " हो-यांग-हो" या नदीला चिनी संस्कृतीची जन्मदात्री असे म्हणतात.
८. हवामानाचा एक नवीन कालखंड पृथ्वीवर सुरू झाला होता त्यास काय म्हणत ?
उत्तर - पृथ्वीवर सुरू झालेला हवामानाचा होलोसिन हा नवीन कालखंड होता.
____________________________________________________
प्रश्न २ - खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (१०)
१. मातीची भांडी बनवण्यासाठी नवाश्मयुगीन कारागिरांना कोणत्या गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक होते ?
उत्तर - मातीची भांडी बनवण्यासाठी नवाश्मयुगीन कारागिरांना खालील बाबींचे ज्ञान असणे आवश्यक होते
१. चिकन मातीचा स्त्रोत माहीत असणे.
२. ती माती वाहून आणण्याची तजवीज करणे.
३. माती उत्तम प्रकारे मळून तयार करणे.
४. भांड्याला हवा असलेला आकार देणे.
५. भांडे सुशोभित करणे.
६. योग्य तापमानाला ते भांडे भाजणे. (८५०° ते ९००°सेल्सिअस तापमान)
____________________________________________________
२. नवाश्मयुगात मानवी जीवनशैलीत कमालीचा बदल घडून आला ते स्पष्ट करा ?
उत्तर - १. नवाश्मयुगात शेतीचे तंत्र विकसित झाले, त्यामुळे शेतीच्या कामाचे स्वरूप पाहता शेतकऱ्यांना टिकाऊ जमिनीच्या ठिकाणी राहणे गरजेचे असल्याने आणि अन्न मिळवण्यासाठी सततच्या भ्रमंतीची गरज उरली नसल्याने स्थिर गाव वसाहती निर्माण झाल्या.
२. कायमस्वरूपी घरे हे नवाश्मयुगीन गाव वसाहतींचे स्वरूप होते. तेथे गाव वसाहतींच्या अनोत्पादनाच्या साखळीशी संबंधित व्यवहारांचे नियंत्रण करणारी मध्यवर्ती यंत्रणा प्रस्थापित झाली. याशिवाय घर कुटुंब, जमिनीवरील मालकी हक्क, नातेसंबंधांची गुंफण या गोष्टी अस्तित्वात आल्या.
३. याव्यतिरिक्त विविध कुशल कारागिरांचा वर्ग अस्तित्वात आला.
४. चाकाच्या शोधाने तर मानवाच्या जीवनात फार मोठा बदल होत गेला.
याचाच अर्थ, नवाश्मयुगात शेती आणि पशुपालनामुळे मानवी जीवनशैलीत कमालीचा बदल घडून आला.
____________________________________________________
३. भारतातील आद्य शेतकरी आणि शेतीची सुरुवात याविषयी थोडक्यात माहिती लिहा.
उत्तर - १. भारतीय उपखंडातील आद्य शेतकऱ्यांच्या म्हणजे नवाश्मयुगीन वसाहतीमध्ये इ. स. पू ७००० च्या सुमारास अस्तित्वात आलेल्या मेहेरगढ या स्थानाचे विशेष महत्त्व आहे. येथील लोक बार्ली व गव्हाचे पीक घेत असत.
२. याशिवाय उत्तर प्रदेशातील संत कबीर जिल्ह्यात असलेल्या लहूरादेवी या ठिकाणी मेहेरगढला समकालीन असलेली गंगेच्या खोऱ्यात अस्तित्वात आलेली एक नवाश्मयुगीन गाव वसाहत होती.
३. महाराष्ट्रातील मध्ययुगीन माणूस इ.स.पू.१०००० ते ४००० या कालखंडात गुहांमध्ये, शैलाश्रयांच्या आश्रयाने राहत होता. तथापि, महाराष्ट्रात पूर्णता नवाश्मयुगीन स्वरूपाची स्थळे मिळालेली नाहीत. तर ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहतींचे पुरावे मिळाले आहेत.
४. महाराष्ट्रातल्या आद्य शेतकऱ्यांच्या गाव वसाहती ताम्रपाषाणयुगीन होत्या. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील इनामगाव हे ताम्रपाषाण युगीन शेतकऱ्यांच्या गाव वसाहतींचे अत्यंत महत्त्वपूर्ण उदाहरण आहे.
____________________________________________________