"एका वडीलांचा तारूण्यात प्रवेश करणाऱ्या मुलास महत्वपुर्ण संदेश"
माझ्या लाडक्या मुला मी जे पत्र तुला आज लिहितोय, ते तु निट वाच आणि ठरव.हवे तर, हे पत्र तु सेव्ह करून ठेव.
१.बेटा, जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाहीत. सगळंच अर्त्यक्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोलायलाच हव्यात.
२.मी जन्मदाता आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते कदाचित तुला इतर कुणीही कधीच सांगणार नाही पटले तर विचार कर.
३. मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास खुपच कमी होईल.
४. बेटा, प्रथम हे सतत लक्षात ठेव की, कधीही कोणत्याच माणसांविषयी मनात आकस ठेवू नकोस. कुणाचा ही द्वेष करू नकोस. तुझ्याशी सर्वांनी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी सक्ती आपण कुणावरही करू शकत नाही. त्यामुळे ते असंच का वागतात ? असं म्हणून कधीही तणतणू नकोस त्याने तुलाच त्रास होईल.तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त तुझ्या आई-बाबांचीच आहे कारण तेच एक नात असे आहे की आपल्या मुलांच्या प्रगतीवर कधीच जळनार नाही . तेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी तर चांगल वागच. परंतु जे तुझ्याशी तुसडेपणाने कींवा वाईट हेतूने वागतात त्यांच्याशी देखील तु वाईट वागु नकोस. पण हे देखील कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट, कुठल्या ना कुठल्या हेतुपोटी करीत असतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगली वागतात त्यांना तु खरंच आवडत असशीलच असे ही नव्हे जसे एक म्हण आहे " "मूहमे राम बगल मैं छूरी, हेतुपुर्तीसाठी कदाचीत ते असे वागु शकतात. तेव्हा माणसं जरा तपासून बघत जा. पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची कदापी ही घाई करू नकोस जो माझा स्वताचा अनुभव आहे. आज मीं जे काही वाचविले आहे ते आपले नशीब बाकी ज्यानी मला फसऊन डुबविले तेही माझे नशीब.जे तुझा विश्वासघात करतील त्यांना माफ कर पण पुन्हा विश्वास ठेऊ नकोस . विश्वासघाताचा फटका असह्य असतो .एकावेळेस माणूस श्रमाने थकला की निवांत झोपतो पण विष्वासघात झालेला माणूस हां विचाराने थकतौ तो कधीच निवांत झोपू शकत नाही.
५. जगणं कशानंच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुम्हाला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तुम्ही जीव तोडून प्रेम केलय ते तुमच्या आयुष्यातून निघून ही जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नसते. आणि कधीच थांबतही नाही. तसेंच ह्या जगात कुणाचेही कुणा वाचून आडत नाही पण बऱ्याचदा वाटते की आपल्याजवळ कोणीतरी विश्वासाचे हवेत.
६. आयुष्य फार छोटं आहे. आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज तु वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाऊ शकते. त्यापेक्षा आजच मनापासून, भरभरून जग, आनंदी रहा. आजच आनंदी जगणं उद्यावर अजीबात ढकलु नकोस.
७. प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणे बदलते. ज्यांच्यावर तु जिवापाड प्रेम करतो ते समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतात. माझी आई म्हणजे तुमची आजी गेल्यानंतर मी कित्येक दिवस अस्वस्थ होतो. परंतु कालांतराने मी देखील सेट झालोच ना ? या करीता काळ हे सर्वोत्तम औषध आहे. हे मनावर बिंबव. सदैव लक्षात ठेव. प्रेमात पडला म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं कधीही समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खाला जास्त कवटाळून ही बसू नकोस.
८. अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झालेत. अशा कहाण्या तु वाचल्या असशील, पण याचा अर्थ असा नाही की, शिक्षण सोडलं की तु यशस्वीच होशिल. नॉलेज, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे सदैव लक्षात ठेव, ते मिळवण्याचा प्रयास सातत्याने कर वेळ काढून थोडा आध्यात्मिक हो ज्या मुळे चंचल मनाला शांती मिळते व एक अद्रुष्य शक्ती आपल्या आजूबाजूला असल्याची जाणीव होते. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना!
९. माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तुम्ही सांभाळावं, मी ही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तेव्हा तु स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी नैतिक जबाबदारी. त्यानंतर तुम्हाला बसमधून फिरायचं की रोल्स राईस किंवा लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तुच घ्यायचाय.
१०. आणखी शेवटचं एक, मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, पण ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते व खर्चावर नियंत्रण ठेव पैसा फार महत्वाचा आहे त्यामुळे पैसा वाचवणे शिकले पाहीजे. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही त्यासाठी प्रामाणिक कष्ठ करण्याची तयारी ठेव.
१२. बेटा,नाव कमवायला फार मोठे कष्ट करावे लागतात पण गमवायला एक क्षणही लागत नाही हे लक्षात ठेव.
तुझेच बाबा