शिक्षकांच्या एकीला व डॉक्टरांच्या कार्याला माझा सलाम

 " शिक्षकांच्या एकीच्या बळाने, मी मृत्यूच्या      जबड्यातूनही वाचलो"
           
   "माझे डॉक्टर व शिक्षक बांधव यांचे मनापासून धन्यवाद"
       
          
            प्रसंग तसा नवीन नाही. अनेकांनी तो प्रसंग अनुभवला आहे. सर्व शिक्षकांच्या एकीने व्यक्तीवरील नव्हे तर राज्यावरील सुद्धा अनेक संकटे दूर झालेली आहेत. Covid-19 सारख्या संकटावर सुद्धा सर्व शिक्षक बांधवांच्या सहकार्यामुळेच मात झाली आहे. आज मात्र मी माझ्या सहकारी शिक्षक बांधवांच्या "सहकारी वृत्तीचा" मला आलेला अनुभव सांगणार आहे. मी लोखंडे एच आर. सर सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील श्री महाकाली इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयावर "वाढीव प्रस्तावित पदावर" गेली ११ वर्ष विनावेतन कार्य करतोय. फक्त मीच नाही तर माझ्यासारखे  "शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचारांची उज्वल परंपरा असणाऱ्या आपल्या महाराष्ट्र राज्यातील"  जवळपास "१२९८ शिक्षक विनावेतन वाढीव प्रस्तावित पदावर कार्य करीत आहेत." या ११ ते १२ वर्षाच्या प्रदीर्घ काळात मला "श्री रामनाथ वाकडे " सर व इतर सर्वच माझ्या सहकारी बांधवांनी मला नेहमीच मोलाची मदत केली. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकलो. आज मी वर्णन करणारा प्रसंग हा माझा पहिलाच प्रसंग नाही. मे २०१८ ला मला "रत्नागिरी -पुणे स्टेशन " या रात्री ८.१५ ला रत्नागिरीहून सुटणाऱ्या एसटी बसमध्ये" आंबा घाटामधे "गेल्यावर तीव्र अटॅक आला होता. यावेळी "श्री. प्रज्ञेश देवस्थळी, श्री राजाराम हातकर सर व इतर माझे सर्व सहकारी यांच्या आर्थिक मदतीने मी हॉस्पिटलचा खर्च करू शकलो. त्या पहिल्या प्रसंगातून मी  वाचलो.
           हा माझा हृदयविकाराचा दुसरा प्रसंग. बीपी, शुगर, हृदयविकार हा सर्व त्रास असल्याने माझे "वर्क फ्रॉम होम " म्हणजे घरूनच विद्यार्थ्यांना गुगल मीट द्वारे अध्यापन चालू होते. ऑनलाइन अध्यापनप्रमाणे ऑनलाइन टेस्टही चालू होत्या. अचानक "कोकण बोर्ड परीक्षक व नियामक फॉर्मवर" सही करण्यासाठी मला साताऱ्यावरून रत्नागिरीला (आडिवरे) माझ्या भाच्याला घेऊन शाळेत जावे लागले. दिनांक ५ नोव्हें.२०२० चा दिवस. सकाळी १०.१५ ला छातीमध्ये पेंनिंग सुरू झालं. मी आडिवरेमधील "गोखले डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये" गेलो. हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी असल्याने आणि हे माझे नेहमीच छातीत पेनिंग होत असल्याने मी त्याकडे दुर्लक्ष करून शाळेत गेलो. शाळेतील सर्व कामे केली. परंतु दुपारी बारा वाजता छातीतील पेनिंग वाढले. मी सरळ गोखले डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी क्षणार्धात मला रत्नागिरीमधील लोटलीकर हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले. गोखले डॉक्टरांनी मला फोर व्हीलरने जाण्यास सुचवले. फोर व्हीलर न मिळाल्यास तसे मला सांगा असेही डॉक्टर बोलले. मी मात्र खिशामध्ये मर्यादित पैसे असल्याने फोर व्हीलर ने न जाता टू व्हीलरने माझ्या भाच्या बरोबर व माझे मित्र गोगटे कॉलेजचे प्राध्यापक डॉ. सरतापे सर यांच्याबरोबर हॉस्पिटलला दुपारी दीड वाजेपर्यंत पोहोचलो. लोटलीकर हॉस्पिटलमध्ये त्वरित हृदयाचा ECG काढण्यात आला. त्यावरून मला त्वरित आयसीयूमध्ये ऍडमिट केले. श्री.लोटलीकर डॉक्टरांकडे पूर्वीपासूनच ट्रीटमेंट चालू असल्याने त्यांना माझी पूर्ण हिस्ट्री माहित होती. त्यांनी कसलाही विचार न करता औषध उपचार सुरू केला. माझे छातीतील पेनिंग बंद झाले. लोटलीकर डॉक्टरांनी ऍन्जिओग्राफी करण्यास अगोदरच म्हणजे मार्च २०२० मध्येच मला सुचवले होते. मी ही डॉक्टरांना मे २०२० च्या उन्हाळी सुट्टीमध्ये ऍन्जिओग्राफी करतो असे सांगितले होते. कोरोणामुळे ते तसेच राहून गेले. लोटलीकर डॉक्टरांनी मात्र त्वरित हृदयाची " टू डू ईको टेस्ट " करून " ऍन्जिओग्राफी "टेस्टही केली. त्यामध्ये हृदयामध्ये दोन ब्लॉकेजेस असल्याचे निदर्शनास आले. दोन्हीही ब्लॉकेजेस ९० टक्के होते. त्यामुळे मला हृदयाची  "अँजिओप्लास्टी " करणे गरजेचे होते. मेडिसिन किंवा इतर खर्चासाठी मला पैशाची आवश्यकता होती.
            कोण म्हणतं ? "शिकवणे " हेच फक्त शिक्षकाचे काम आहे. माझ्या सर्वच महाराष्ट्रातील सहकारी शिक्षकांनी राज्यावर आलेल्या covid-19 सारख्या महाभयंकर असणाऱ्या संकटाचासुद्धा "कोविड योद्धा" बनून पाडाव केला. मलाही सध्या विनावेतन काम करत असल्याने आर्थिक मदतीची आवश्यकता होती .त्यामुळे  मी " आई सी यु " मध्ये ऍडमिट असतानाही, मी शिक्षक असल्याने माझ्या काही "शिक्षक संघटनांच्या माझ्या सहकारी बांधवांना " मदतीचे आवाहन केले. त्यामध्ये "माझ्या शाळेचे संस्था अध्यक्ष श्री सुधीर जोशी सर, मुख्याध्यापक श्री गावित सर , श्री. कानविंदे सर, सौ कुलकर्णी मॅडम कांचन जाधव मॅडम व आजी व माजी सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ " , शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव "श्री सुधीर घागस सर" , "अध्यापक संघ शिक्षक संघटनेचे श्री. आत्माराम मेस्त्री सर" , "कास्ट्राईब संघटना रत्नागिरी चे अध्यक्ष श्री. प्रदीप वाघोदे सर" ,"रत्नागिरी जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे श्री. प्रकाश अवताडे सर" व "माझे वाढीव पदावरील विनावेतन काम करणारे सर्व सहकारी शिक्षक बांधव" यांनी मोलाची आर्थिक मदत केली. या सर्व माझ्या शिक्षकशिक्षकेतर बांधव व "श्री. लोटलीकर डॉक्टर , हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या माझ्या विद्यार्थिनी कु. प्रियंका पवणाक, कु. स्वप्नाली कुंभार, कु. अनुजा लिंगायत व हॉस्पिटलचा इतर स्टाफ " यांच्या  या सर्वांच्या अथक परिश्रमानेसहकार्याने "मृत्यूच्या जबड्यात सापडलेला , "माझ्या दोन मुलींचा बाप " या सर्वांनी मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढला. त्यांच्या सहकार्यामुळेच मी हे सर्व लिहू शकतोय. या सर्वांनाही चांगले आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा सर्वांचे मला केलेल्या सहकार्यामुळे खूप खूप धन्यवाद! 

       
                   
                "भवतु सब्ब मंगलम"!!!