महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उंब्रज
इतिहास (३८) प्रश्नपेढी
प्र.१ पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
१) आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक कोणास म्हणतात?
- गॅलिलिओ यास म्हणतात
२) वराहमिहिर यांनी कोणता ग्रंथ लिहिला?
- बृहत्संहिता हा ग्रंथ
३) लोकमान्य टिळकांनी मंडाले येथे कोणता ग्रंथ लिहिला?
- गीतारहस्य हा ग्रंथ
४) इंग्रजांनी थिबा राजाला कैद करून कोठे ठेवले?
- रत्नागिरी येथे
५) थिबा राजाने ब्रह्मदेशातून येताना सोबत कोणाची मूर्ती आणली?
- भगवान गौतम बुद्धांची मूर्ती
६) १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या दिल्लीच्या बादशहाचे नाव लिहा.
-बहादुरशहा बादशहा
७) इंग्रजांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कोणत्या तुरुंगात ठेवले होते?
- मंडालेच्या तुरुंगात
८) इंग्रजांच्या वखारीमध्ये कोणत्या इमारती असत?
-
९) वखारीतील जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश होता?
- पाव ,मांस ,भात ,डाळ, तांदूळ खिचडी व लोणचे हे पदार्थ
१०) इंग्रजांनी मनोरंजनासाठी कोणत्या शहरात बागा उभारल्या होत्या?
- सुरत, कारवार, मच्छलीपट्टण पेतोपोली,चेन्नई,मुंबई.
११) सावकारामध्ये कोणत्या लोकांचा समावेश आहे?
- पोर्तुगीज, इंग्रज ,डच आणि डॅनीश
१२) परदेशातील राज्यकर्त्यांना कोणती इच्छा आहे?
१३) युरोपीय व्यापाऱ्यांना कोठे जागा देऊ नये असे आज्ञापत्रात म्हटले आहे?
- जलदुर्ग जवळ
१४) ईस्ट इंडिया कंपनीने वृत्तपत्रावर कडक नियंत्रणाचा कायदा कोणत्या वर्षी केला?
- १८२४ मध्ये
१५) राजा राम मोहन रॉय यांनी त्यांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे कोणाला अर्ज केला?
- इंग्लंडच्या राजाकडे
१६) उमाजी नाईक यांनी कोणाच्या विरोधात जाहीरनामा काढला?
- ब्रिटिशांच्या विरोधात
१७) 'कलम १२४अ भारतीय दंडविधानात कोणत्या वर्षी समाविष्ट केले गेले?
- १८७० या वर्षी
१८) 'कलम १२४अ भारतीय दंडविधानात कोणी समाविष्ट केले?
- जेम्स फिटझ स्टीफन
१९) 'कलम १२४अ या कायद्यानुसार शिक्षा झालेले पहिले साप्ताहिक कोणते?
- बंगवासी
२०) इंग्रजी सत्तेविरुद्ध 'बंगवासी' या साप्ताहिकाने कोणता आक्षेप घेतला?
- आमच्या धार्मिक प्रथा परंपरामध्ये इंग्रज हस्तक्षेप करत आहेत.
२१) १५ जून १८९७ रोजी पुण्यातून प्रसिद्ध झालेल्या केसरी अंकात कोणती कविता प्रसिद्ध झाली?
- शिवाजींचे उद्गार
२२) 'कलम १२४अ' या कलमान्वये राजद्रोही ठरवून शिक्षा झालेले पहिले संपादक कोण?
- लोकमान्य टिळक
२३) 'देशी भाषा वृत्तपत्र कायदा' कोणत्या वर्षी लागू झाला?
- १४ मार्च १८७८ या वर्षी
२४) 'देशी भाषा वृत्तपत्र कायदा' या कायद्याच्या विरोधात देशी वृत्तपत्रकारांची एक परिषद कोठे
भरवण्यात आली?
- कोलकाता येथे
२५) 'देशी संपादकांची परिषद आयोजित करण्यात कोणाची प्रमुख भूमिका होती?
- गणेश वासुदेव जोशी आणि महादेव गोविंद रानडे
२६) 'देशी भाषा वृत्तपत्र कायदा' या कायद्याच्या अंतर्गत केंद्र सरकारने मराठी भाषेतील किती पुस्तके जप्त केली?
- २१० पुस्तके
२७) 'देशी भाषा वृत्तपत्र कायदा' या कायद्यान्वये कोणाविरुद्ध खटले भरले गेले?
- लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे , गणेश दामोदर सावरकर
२८) 'देशी भाषा वृत्तपत्र कायदा' या कायद्याअंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कोणते पुस्तक जप्त झाले?
- १८५७ चे स्वातंत्र्यसमर
२९) अजय मुखर्जी स्वातंत्र्यानंतर कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री झाले?
- पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री
३०) अजय मुखर्जी यांनी कोणाला मुलाखत दिली?
- श्रीपाद केळकर यांना
३१) एक शेर म्हणजे किती छटाक?
- १६ छटाक
३२) अजय मुखर्जी यांनी दुष्काळाच्या काळात नऊ महिने कश्या पध्दतीने काढले?
- तीन छटाक भात व थोडीशी डाळ खाऊन
३३) १७ सप्टेंबर हा हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा दिवस मराठवाड्यात कोणता दिवस म्हणून साजरा केला
जातो?
- मराठवाडा मुक्ती दिन म्हणून
३४) हैदराबाद मुक्ती संग्रामात कोणी हौतात्म्य पत्करले?
- वेदप्रकाश, श्यामलाल, गोविंद पानसरे, श्रीधर वर्तक, बहिर्जी शिंदे.
३५) फॅसिझम हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून बनलेला आहे?
- फॅसिस या शब्दापासून
३६) पहिल्या महायुद्धानंतर फॅसिझमची चळवळ इटलीमध्ये कोणी उभारली?
- बेनेटो मुसोलिनी
३७) नाझीवादामध्ये कशास महत्त्व दिले होते?
- वंशश्रेष्ठत्वास महत्व
३८) डॉक्टर कोटणीस यांचा जन्म कधी व कोठे झाला?
- १० ऑक्टोबर १९१० रोजी सोलापूर येथे झाला
३९) प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांनी कोणता चित्रपट निर्माण करून डॉक्टर कोटणीस यांची स्मृती चिरस्थायी केली?
- डॉक्टर कोटणीस की अमर कहानी
४०) दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सॅम माणकेशा यांना ब्रह्मदेशात कोणाचे हल्ले रोखण्यासाठी पाठवण्यात आले होते?
- जपानी सैन्याचे हल्ले
४१) मेजर जनरल डी.टी कोवान यांनी सॅम माणकेशा यांना कोणते पदक दिले?
- मिलिटरी क्रॉस हे पदक
४२) सॅम माणकेशा यांनी स्वतंत्र भारतातील सैन्यामधील कोणते महत्त्वाचे पद भूषवले?
- फिल्ड मार्शल
४३) निर्वसाहतीकरणास चालना मिळण्यास कोणती सनद कारणीभूत आहे?
- अटलांटिक सनद
४४) अटलांटिक सनद कोणी घोषित केली?
- फ्रँकलिन रुजवेल्ट आणि विस्टन चर्चिल
४५) १९६१ साली कोठे झालेल्या परिषदेत अलिप्ततावादी चळवळीच्या निकषांना मान्यता मिळाली?
- बेलग्रेड येथे
४६) महाराष्ट्रातील पहिली रात्र शाळा कोणी, कधी व कोठे सुरू केली?
- महात्मा ज्योतिराव फुले यांनी 19 व्या शतकात पुणे येथे सुरू
४७) महाराष्ट्रातील पूर्ण साक्षर झालेले जिल्हे कोणते?
- सिंधुदुर्ग व वर्धा
४८) इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज INTACH या संस्थेची स्थापना कधी व कोठे करण्यात आली?
-१९८४ मध्ये नवी दिल्ली येथे
४९) INTACH या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
- नवी दिल्ली येथे
५०) INTACH या संस्थेच्या आज देशभरात किती शाखा आहेत?
- २०० हून अधिक