“देश बदलणाऱ्या दोन लुगड्याची कहाणी.."

“देश बदलणाऱ्या दोन लुगड्याची  कहाणी.."

     सावित्रीचे भिजलेले लुगडं पाहून ज्योतिबा म्हणाले, "अगं कां एवढ्या घाईत अश्या ओल्या अंगाने आलीस ? 
      "शाळेतून परत येताना लोकांनी शेण गोळे, चिखल फेकला अंगावर.घाण वास येत होता म्हणून हौदातून पाणी घेतलं लुगड्यावरून."
        " खूप त्रास होतो का गं साऊ." ह्या ज्योतिबाच्या केविलवाण्या प्रश्नावर साऊ हसून उत्तर देते. "नाही होत त्रास.आपण मलिन नाही आहोत ,कितीही घाण फेकली तरी,आपण शुद्धच असू.मला अजिबात वाईट वाटत नाही, राग आणि त्रासही होत नाही, कारण धनी, जी ज्ञानाची ज्योत तुम्ही लाविली ना त्याची वात आहे ही साऊ. झालेला अपमान, फळ्यावरून खडू फिरवताना आणि खुललेले मुलींचे चेहरे पाहून कुठल्या कुठे विरून जातो.लुगडं ओलं होत जरा,त्रासही होतो पण मन अभिमानाने भरतं बघा."
         असंच, फाटलेल्या लुगड्याला रमा ठिगळ जोडीत होती.बाबासाहेबांनी पुस्तकातून लक्ष काढून वरती पाहिलं.रामू कंदिलाच्या प्रकाशात ठिगळ लावते.रामू उद्याच बाजारातून तुझ्यासाठी नवं लुगडं घेऊन येवुया.बाबासाहेब डोळ्यात पाणी आणत म्हणाले. " रमा म्हणाली, तुमच्या शिक्षणासाठी मी पैसे जोडतीया,अन तुम्ही भी लै मन लावून शिकतासा.जातील हे दिवस थोडं सहन कराव लागेल आपल्याला,ह्यो समाज बदलायचा ना तुम्हाला.ह्यो समाज आपलं पोर आहे जणू, आपण लै मेहनत घेऊ." 
         बाबासाहेब डोळ्यावरील चष्मा काढून म्हणाले " रमा तुझं हे फाटलेले लुगडं समाजासाठी या देशासाठी, मायेची सावली होईल बघ."
      " साहेब बघा किती छान ठिगळ आलं." अन बाबासाहेबांच्या डोळ्यात आभाळ भरून आलं.
          माता सावित्रीमाई आणि माता रमाईंच्या त्यागामुळे आज समस्त स्त्री ही मोठ्या मानाने जगत आहे. अशा महान नायिकांना विनम्र अभिवादन 🙏