मा.रतन टाटा-प्रेरणादायी विचार

                                                निसर्ग नियम-मा. श्री. रतन टाटा                      
                                           मित्रांनो आज मी तुम्हाला एक सत्य घटना सांगणार आहे जी ऐकून "क्रिया तशी प्रतिक्रिया" हा निसर्गाचा नियम आपल्या आयुष्यात कसा लागू होतो याचा तुम्हाला उलगडा होईल. ही गोष्ट इतकी मार्मिक आणि रोमांचकारी आहे की, तुम्हाला जर घटनेतील मर्म नीट सजले आणि उमजले तर तुमच्या आयुष्याचे कोड कल्याण होईल. याची खात्री मी तुम्हाला देतो. 1892 साली स्टँफर्ड विद्यापीठामध्ये एक 18 वर्षाचा युवक शिकत होता.पण त्यावर्षी त्याच्याकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते. तो अनाथ असल्यामुळे पैसे कसे जमा करायचे हे त्याला समजत नव्हते. विचार करता-करता त्याला एक कल्पना सुचते. तो आणि त्याचा मित्र मिळून त्याच्या कॅम्पस मध्ये एक संगीताचा कार्यक्रम करायचे ठरवतात. म्हणजे त्या कार्यक्रमाच्या तिकिटातून जे पैसे येतात ते फी म्हणून भरता येईल हा त्यांचा प्लॅन होता. मग ते दोघे महान पियानो वादक जेन पॅडरस्की यांच्याकडे पियानो भाड्याने घेण्यासाठी जातात. पॅडरस्की यांचा मॅनेजर त्यांना पियानोचे भाडे 2000 डॉलर्स होतील हे सांगतो. दोघेही ते मान्य करतात आणि कार्यक्रमाच्या तयारीला लागतात.
                                            कार्यक्रमाचा दिवस उजडतो आणि त्यांचे दुर्भाग्य असे की त्यांना तिकीट विक्रीतून फक्त 1600 डॉलर्स मिळतात. म्हणजे पुरेसे तिकीटे विकले जात नाहीत. कार्यक्रम संपतो पण त्यांना काळजी असते की आता पैसे आणायचे कुठून? फी चे तर पैसे आले नाहीत उलट पॅडरस्की यांचे 400 अतिरिक्त डॉलर त्यांना द्यावे लागणार होते. या चिंतेत ते पॅडरस्की यांच्याकडे पियानो द्यायला येतात. त्यांना ते 1600 डॉलर्स कॅश देतात आणि 400 डॉलर्सचा चेक देतात. आणि तो युवक म्हणतो की लवकरच हा 400 डॉलर्सचा चेक वटला जाईल. फक्त आम्हाला काही दिवसांची मुदत हवी आहे. त्यावर पॅडरस्की म्हणतात, नाही. मी तुमच्याकडून ही रक्कम स्वीकारू शकत नाही. ते चेक फाडून टाकतात आणि 1600 डॉलर्स कॅश त्या युवकांना परत देत म्हणतात तुमचा जो काही खर्च कार्यक्रमासाठी झाला तो आणि तुमची फी ह्या रकमेतून काढून घ्या आणि मग उरलेली रक्कम मला द्या. हे ऐकून त्या दोघांना प्रचंड आश्चर्य वाटते. त्यांना समजत नाही काय बोलावे. ते पॅडरस्की यांचे खूप खूप आभार मानून तिथून निघून जातात.
                                            पॅडरस्की हे महान पियानो वादक होतेच पण ते व्यक्ती म्हणून सुद्धा खूप महान होते, कारण त्यांनी अशा युवकांना मदत केली होती ज्यांना ते ओळखत पण नव्हते. काही वर्षांनंतरही पॅडरस्की हे पोलंडचे पंतप्रधान झाले. ते चांगले नेता होते पण दुर्दैवाने 1942 ला पोलंडच्या 15 लाखाहून अधिक नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. पॅडरस्की यांना समजत नव्हते की काय करावे कारण एवढ्या लोकांना पोसण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. कोणाकडे मदत मागावी? मग ते अमेरिकेच्या फूड आणि रिलीफ अडमिनिस्ट्रेशन कडे मदतीसाठी गेले तिथे हबर्ट हुवर नावाचा मुख्याधिकारी होता. त्याला ही बातमी समजल्याबरोबर त्याने लगेच पोलंडच्या नागरिकांना हवं तेवढं अन्न पुरवठा करायचे ठरवले याने पॅडरस्की यांना खूप मोठा दिलासा दिला. सगळे व्यवस्थित झाल्यानंतर पॅडरस्की यांनी हाबर्टला भेटण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे वयक्तिकरित्या जाऊन खूप खूप आभार मानले.
                                           पॅडरस्की यांनी ज्या वेळेस हाबर्टची कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात केली तेंव्हा हबर्ट म्हणाला तुम्हाल आभार मानायची काही गरज नाही, तुम्हाला आठवत असेल की बऱ्याच वर्षांपूर्वी तुम्ही दोन तरुणांना कॉलेजमध्ये फी भरण्यासाठी मदत केली होती. त्या तरुणांपैकी मी एक होतो. मग अत्ता माझे कर्तव्य होते तुम्हाल मदत करणे. हे ऐकून पॅडरस्की यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहतात आणि दोघेही एकमेकांना आलिंगन देतात. मित्रांनो हा निसर्ग किती अद्भूत आणि स्पष्ट आहे. आपण जे पेरतो तेच उगवते.
जेवढी शक्य असेल तेवढी गरजूंना मदत करा. कारण असे करून तुम्ही स्वतःलाच एक प्रकारे मदत करत असता. हा सिद्धांत अगदी मनात कोरून ठेवा, "तुम्हाला आयुष्यात जे काही हवे आहे, ते आधी दुसऱ्याला द्यायला शिका". सुख पाहिजे आहे, आधी दुसऱ्याला सुख द्या. आनंद पाहिजे आहे, आधी दुसऱ्याला आनंद द्या. पैसे पाहिजे आहे, मग तुमच्या क्षमतेप्रमाणे गरजूंना मदत करा. कारण की हा निसर्गाचा नियम आहे, जे तुम्ही देता ते तुमच्याकडे परत येते. निसर्गामध्ये स्वतःचे असे काहीच नाही. नद्या स्वतःचे पाणी स्वतः पित नाहीत. झाडे स्वतःची फळे स्वतः खात नाहीत. फुले स्वतःसाठी सुगंध पसरवत नाहीत. इतरांसाठी जगणे हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यामध्ये जगण्याचे खरे रहस्य आहे.