प्रकरण १ ले - "युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास"
* प्रस्तावना - मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात - युरोपमध्ये - - 'आधुनिक युगाचा पाया घातला- -अनेक घटनांनी -१. प्रबोधन २. भौगोलिक शोध ३. धर्मसुधारणेची चळवळ - या काळास"प्रबोधनयुग"असे म्हणतात. या काळात प्राचीन ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन अनेक क्षेत्रांत घडून आले -१. कला २. स्थापत्य ३. तत्वज्ञान इ. - *प्रबोधन व्याख्या :"प्रबोधन म्हणजे केवळ प्राचीन परंपरांचे पुनरुज्जीवन नव्हते. प्रबोधनाने सर्वांगिन प्रगतीला चालना दिली आणि नवयुगाची सुरुवात झाली."
* युरोपातील धर्मयुद्धे (क्रुसेडस) आणि त्याचे दुरगामी परिणाम :११ वे शतक - १.ख्रिश्चन २. ज्यू ३. इस्लाम धर्मातील -अनुयायांची पवित्र ठिकाणे - इस्लामी सत्ता देशांच्या ताब्यात - उदा.१. जेरुसलेम २. बेथेलहॅम -शहरे प्राप्त करण्यासाठी- ख्रिश्चन अनुयायांच्या लढाया - त्यांनाच धर्मयुद्धे (क्रुसेडस) म्हणतात.
* धर्मयुद्धांना पाठिंबा :मध्ययुगात -धर्मयुद्धाच्या कल्पनेने- युरोपातील सामान्य जनता- भारावून गेली. या काळात-ख्रिस्ती धर्माचे प्रमुख धर्मगुरु'पोप'-युद्धात सामील होणाऱ्या लोकांना-अनेक सवलती जाहीर-'पापक्षालनासंदर्भात'-त्यामुळे जनतेचा युद्धामध्ये- मनापासून सहभाग-युरोपातील अनेक पार्श्वभूमी युद्धास कारणीभूत-उदा.१. सामाजिक २. राजकीय. - युरोपातील सत्ताधारी व व्यापारी - यांचा धर्मयूद्धाना पाठिंबा - विविध कारणांनी -*१.रोमन सम्राटांची इच्छा- धर्मयुद्धाच्या आधारे -अनेक ठिकाणी स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्याची- उदा.१.सीरिया येथे २. आशिया मायनर येथे.* इटलीतील व्यापारी शहरे १. व्हेनिस २. जेनोवा -२.शहरांतील धनिकांची इच्छा-आशियात बाजारपेठा प्रस्थापित करणे.एकूण धर्मयुद्धे -नऊ झाली.-पहिले धर्मयुद्ध-१०९६ मध्ये -दुसरे धर्मयुद्ध - तुर्कांचा विजय - पोप युजिनियस(तिसरा) याने - युद्धात काहीची मदत - १. फ्रेंच राजा सातवा लुई २. जर्मन सत्ताधीश तिसरा कॉनरॅड - या सर्वांचा - तुर्कांनी पराभव - इ.स.११८७ मध्ये - सलादिन (इजिप्तचा प्रमुख) याने -जेरुसलेम जिंकले - नऊ धर्मयुद्धानंतरही - "जेरुसलेम"- इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यात.
* धर्मयुद्धांच्या अपयशाची कारणे :युरोपीय धर्मयुद्धात - ख्रिस्ती धर्मयोद्ध्यांना अपयश -त्यांच्या अपयशास कारणीभूत बाबी -१. पोप व युरोपीय सत्ताधीश यांचा - युद्धाकडे पाहण्याचा संकुचित हेतू २. धर्मावरील - कमी झालेली श्रद्धा ३. युरोपातील राजांमध्ये - एकीचा अभाव ४. पोप व जर्मन सम्राटमधील वितुष्ट ५. बायझॅनटाइन सम्राटांच्या - सहकार्याचा अभाव. इ.
* धर्मयुद्धाचे परिणाम : धर्मयूद्धाबद्दल इतिहासकारांची मते - १. धर्मयुद्धामुळे सरंजामशाहीचा अस्त २. लोकांची पोपवरील श्रद्धा कमी झाली ३. मध्य आशियाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळे - इटली व जर्मनीतील शहरांना नवी क्षेत्रे खुली ४. नवीन व्यापारी वर्ग उदयास. युरोपीय युद्धतंत्रात अनेक बदल - १. किल्ले बांधणी २. किल्ल्यांचा उपयोग -लढाईचे ठाणे म्हणून ३. पूलबांधणी - लष्कराच्या वाहतुकीसाठी ४. शत्रूचे मार्ग - उद्ध्वस्त करणे ५. लढाईचा खर्च भागवण्यासाठी - युरोपीय राजांनी नवीन कर लागू (कर थेट राजाच्या तिजोरीत जमा) - वरील सर्व बाबींत - युरोपीय राष्ट्रांचे प्राविण्य - युरोपीय लोकांना - अनेक अपरिचित गोष्टी परिचित झाल्या - १. वनस्पती २. फळे ३. अत्तरे ४. पोषाखाचे वेगवेगळे प्रकार ५. साखर ६. सुती व रेशमी कापड ७. मसाल्याचे पदार्थ ८. औषधे ई. - धर्मयुद्धाच्या काळात - यूरोपीय राष्ट्रांचा अरबांशी संपर्क - त्यामुळे युरोपियन राष्ट्रांचा - अनेक नवीन विषय संपर्क व आत्मसात - १. रसायन क्षेत्रातील अरबी शब्द २. संगीत क्षेत्रातील शब्द ३. व्यापार क्षेत्रातील शब्द.
* युरोपातील प्रबोधनाचा काळ :प्रबोधनाचा आरंभ - १४ व्या शतकात , प्रबोधनाचा उत्कर्षकाळ - (१५ वे शतक ते १६ वे शतक), १४ वे शतक ते १६ वे शतक - ३०० वर्षाच्या काळात - "बुद्धिवाद व वैज्ञानिक विचारसरणीवर आधारित संस्कृतीचा पाया घातला", ह्या कालखंडात - मानवाच्या बुद्धीला, प्रतिभेला व जीवनपद्धतीला नवी दिशा, लोकांना अनेक बाबी - समजून घेण्यात स्वारस्य निर्माण , अनेक दुर्लक्षित विषय हाताळण्यात आले - १.काव्य २. नाटक ३. साहित्य इ. *'मानवतावाद' - "पूर्वी विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना - 'ईश्वर' हा केंद्रबिंदू -मात्र आता - 'मानव'हा केंद्रबिंदू बनला - यालाच मानवतावाद असे म्हणतात". वरील ३०० वर्षाच्या काळात - युरोपीय दर्यावर्दीना अनेक बाबींत प्रोत्साहन - त्यामुळे धाडशी दर्यावर्दींनी - १.अनेक दूरवरचे प्रदेश शोधले २. दर्यावर्दींनी पाहिलेल्या प्रदेशातील - अनेक वस्तू व त्यांची माहिती मायदेशी आणली उदा. वनस्पती, फळे, फुले, झाडे, नवनवे प्राणी, विविध शस्त्रास्त्रे इ.- त्यातूनच इ.स.१५४३ मध्ये - 'निकोलस कोपर्निकस' यांनी आपले मत प्रतिपादन केले - "ग्रहमाला पृथ्वीकेंद्रित नसून सूर्यकेंद्रित आहे" , इ.स. १६०९ मध्ये गॅलिलिओने - अधिक सुधारित दुर्बिण तयार - त्यामुळे संशोधनाला गती प्राप्त. गॅलिलिओने - कोपर्निकस व केपलर यांच्या संशोधनाला - वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे पुष्टी -त्यामुळे भौतिक विज्ञानाच्या संशोधनास- चालना प्राप्त. इ.स.१४४० मध्ये - जर्मनीत छापखाना सुरू -जोहान्नेस गुटेनबर्ग याने , इ.स.१४५१ मध्ये -इटलीत पहिला छापखाना सुरू -'छपाईचा शोध' - "जगाला प्रबोधन काळात मिळालेली सर्वोच्च देणगी" ,- छपाईने विविध माहिती व ज्ञान - सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचणे शक्य - 'बंदुकीची दारू व छपाई शोधाने' - युद्धतंत्र व ज्ञानाचा प्रसार यामध्ये अमुलाग्र बदल - १८ व्या शतकात युरोपमध्ये - आधुनिक विद्यापीठे स्थापन - विद्यापीठात अनेक विषयांचा समावेश - १. होमर, इलियड व ओडिसी ही महाकाव्य २. ग्रीक नाटके ३. ख्यातनाम वक्त्यांची भाषणे ४. ललित साहित्य ५. चित्रकला व शिल्पकला ६. नीतिशास्त्र, राज्यशास्त्र व इतिहास हे विषय - अनेक विषयांच्या अभ्यासाने - लोक स्वतंत्रपणे विचार करू लागले
* गॅलिलिओ (इ.स.१५६४-१६४२)माहिती : गॅलिलिओने काही पद्धती रूढ - १. निरीक्षण करणे २. सिद्धांत मांडणे इ.- त्यामुळे त्यांना "आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक"असे म्हणतात -झुकत्या मनोऱ्याच्या प्रयोगातून - अरिस्टॉटलचे मत खोडले -अरिस्टॉटलचे मत "जड वस्तू हलक्या वस्तू च्या मानाने अधिक लवकर खाली पडतात" -गॅलिलिओने सिद्ध केले की - "भिन्न वजनाच्या वस्तूंचा खाली पडण्याचा वेग सारखाच असतो" -गॅलिलिओने सुधारित दुर्बिण (दूरदर्शक) बनवली - त्यामुळे मोठी क्रांती घडली.-दुर्बिणीची क्षमता वाढवण्यात त्यांना यश -दुर्बिणीचा फायदा अनेक बाबींत झाला - १.दर्यावर्दीना समुद्रातील दुरवरच्या भूमी शोधणे सोपे झाले २. गुरु ग्रहाचे चार मोठे व तेजस्वी उपग्रह शोधले ३. अरिस्टॉटलचे मत खोडण्यास मदत -अरिस्टॉटलचे मत-"चंद्र गुळगुळीत व स्वयंप्रकाशी आहे" - ४. गॅलिलिओने मत प्रकट - "चंद्रावर डोंगर व दऱ्या असून तो सूर्यप्रकाशाच्या परावर्तनाने प्रकाशतो" - "सूर्याला स्वतः भोवती फेरी मारण्यास २७ दिवस लागतात" -गॅलिलिओ - "सूर्यावरील डागांचे निरीक्षण करणारा पहिला शास्त्रज्ञ" -गॅलिलिओ च्या आधी सूर्यावरील डागांचा(तमसकीलक) उल्लेख काही ग्रंथात -वराहमिहीर यांच्या बृहत्संहिता ग्रंथात(अनेक शतकांपूर्वी)
* कॅथोलिक चर्च :प्रबोधनपूर्व कालखंड - चर्च - धर्मिक व व्यक्तिगत जीवनाचे नियंत्रण करणारी संस्था - अनेक गोष्टींच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी - प्रबोधनकाळात 'मानवतावादी विचारसरणी' अनेक बाबींद्वारे निर्माण - १.चर्चेच्या धर्मगुरूंनी आज्ञापत्रे काढून- सामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक २. लोकांना स्वतंत्र विचार करण्यास किंवा मांडण्यास बंदी घातली ३. बायबल या पवित्र ग्रंथावर परंपरेपेक्षा भिन्न भाष्य करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाई इ.
* आधुनिक विज्ञान :प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषावर - माणूस सत्याचे आकलन करू लागला - हाच "आधुनिक विज्ञान युगाचा पाया " होय - या काळात अनेक शिक्षणाला महत्व प्राप्त- गणित, विज्ञान व कला -आधुनिक युगाचा प्रारंभी - निसर्गवैज्ञानिक होऊन गेले - उदा. 'लिओनार्दो -दा- विंची'
* कला : प्रबोधनकाळात - विज्ञानाचा प्रभाव कला क्षेत्रावर - 'किमया' क्षेत्रातील गूढवाद कमी झाला - अनेक बाबी वैज्ञानिक पायावर उभ्या - त्याचे रूपांतर - रसायनशास्त्र या वैज्ञानिक शाखेत - किमिया शास्त्रात प्रगती - खनिजे व मूलद्रव्य स्त्रोत यांच्या ज्ञानात भर - तैल रंगातील फलक करण्यास सुरुवात - मानवी शरीररचनेची वैशिष्ट्ये दाखवणाऱ्या आकृती चित्रित - यामध्ये चित्रकारांची कामे महत्वाची - उदा. 'लिओनार्दो-दा-विंची' व 'मायकेल अँजेलो'
* विज्ञानाचा विकास :१७ व्या शतकांत - निसर्ग शास्त्रज्ञांनी "वैज्ञानिक ज्ञानाचा पाया" रचला - शास्त्रज्ञांचा पुढील गोष्टींवर भर - १. प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थलकालातील महत्व आहे हे सिद्ध करणे २. नव्याने शोधून काढलेले नियम सूत्रबद्ध करणे ३. नवी वैज्ञानिक परिभाषा तयार करणे - वरील प्रयत्नाने - आधुनिक विज्ञान प्रगत बनले.
* वैज्ञानिक संस्था : वैज्ञानिक संशोधनासाठी - युरोपमध्ये काही संस्था स्थापन - १.रोममध्ये "अकॅडमी ऑफ द लिंक्स अाइड (लिंक्सीएन अकॅडमी),२. फ्लोरेन्समध्ये "अकॅडमी फोर एक्सपिरीमेंट",३. लंडनमध्ये "रॉयल सोसायटी फॉर इम्प्रोविंग नॅचरल नॉलेज", ४.फ्रान्समध्ये "फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस" इ.- संस्था स्थापनेचा हेतू भिन्न - १. इंग्लंड-फ्रान्समध्ये शास्त्रज्ञांचे लेख प्रकाशित करणारी नियतकालिके चालवणे २. पत्रव्यवहार, शंका समाधान, व वैचारिक देवाण-घेवाण करण्यासाठी.
* विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध : युरोपमध्ये मध्ययुगाचा अखेरचा टप्पा - अनेक शोध लागले - १. होकायंत्र २. दुर्बीण ३. सूक्ष्मदर्शक यंत्र ४. तापमापक यंत्र ५. भारमापक यंत्र
लेखन - श्री. लोखंडे एच. आर.