संयुक्त महाराष्ट्र आंदोलन-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे योगदान

"संयुक्त महाराष्ट्र आंदोलन -लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे योगदान"


 ऐकण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा.




अण्णाभाऊ साठे यांचे कार्य
तुकाराम भाऊराव साठे (१ ऑगस्ट १९२० — १८ जुलै १९६९) हे अण्णा भाऊ साठे[ म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारकलोककवी आणि लेखक होते.साठे एका मांग (दलित) समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादीझाले

वैयक्तिक जीवन

अण्णा भाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगलीजिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई साठे होते. साठे हे शाळेत शिकलेले नाही, केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तेथील सवर्णांद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांनी दोन लग्न केलीत, त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे तर दुसरी जयवंता साठे ह्या होत. त्यांना एकूण तीन अपत्ये होती - मधुकर, शांता आणि शकुंतला.