जीवनाचा मौलिक विचार

           जीवनाचा मौलिक विचार

          कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा, आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा...  स्पर्धा स्वत:शी करा जगाशी नाही...
रागावू नका, आजची खरी वस्तुस्थिती पहा : घरं मोठी, पण कुटुंबं छोटी...भरपूर पदव्या, पण सामान्य ज्ञानाची बोंब... दर्जेदार औषधं, पण आरोग्य ढासळलेलं... चंद्रावर पोहोचले, पण शेजाऱ्याशी ओळख नाही... प्रचंड पैसा, पण मन:शांती नाही... उच्च बुद्ध्यांक, पण भावनांक खालावलेला... माहिती खूप, पण शहाणपण नाही... आणि सरते शेवटी माणसं भरपूर, पण माणुसकीच नाही...!!!
जेव्हा लोक तुमच्यामागे तुमची बदनामी किंवा खोटी लावालावी करतात, तेव्हा समजावे की, त्यांची उतरती कळा चालू होतेय आणि आपली उत्तुंग भरारी...?
शक्यतो आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडावी... नाहीतर ​तासभर साथ देणारी माणसं, बसमध्ये पण भेटतात.​.. कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका...कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय...​अगरबत्ती देवासाठी हवी असते, म्हणून विकत आणतात... पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.​नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही... समजा मिळाले, तर ते टिकत नाही... आणि टिकले, तर ते शोभत नाही... म्हणून जीवनात योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीसमोर आणि योग्यवेळी नम्र झालेच पाहिजे...

वाहत्या पाण्याप्रमाणे चांगले काम करीत रहावं... वाईटाचा कचरा आपोआपच किनाऱ्याला लागेल"..

                         श्री. लोखंडे एच. आर.