*सकारात्मकता*
*चालता चालता!*
*एका चित्रपटातलं दृश्य. 'राजू बन गया जंटलमन ' मध्ये जुही चावला रस्त्याने चालत असते.पाया ला दुखापत झालेली असल्याने लंगडत लंगडत चालत असते. तिच्या चाळीत नवीन रहायला आलेला शाहरुख खान तिला चालताना दिसतो,तो सुद्धा तिच्या सारखा लंगडत चालत असतो,जुही रागारागात त्याला विचारते नेहमीचंच.*
*शर्म नही आती राह चलती लडकी को...*
*यावर शाहरुख तुटलेली चप्पल दाखवतो आणि दृश्यच बदलतं आता तो तिला गप्प करतो*.
*आपल्याही आयुष्यात ब-याचदा असे प्रसंग घडतात. आपण समजतो काही आणि सत्य असतं वेगळंच! खरं कळल्यावर आपण खजिल होतो अनेकदा तर अपराधी वाटतं अशा प्रसंगात उपयोगी पडतो 'सॉरी'हा एकच शब्द!*
*या पलिकडे जास्त बोललं तरी प्रसंग हाताबाहेर जातो आणि एक' सॉरी' नाही म्हटलं तरी राईचा पर्वत होतो. म्हणून हा शब्द मला ' जादूचा शब्द ' वाटतो*.
*आपण कोणत्याही बाजूला असू ,अशा घटना गुन्हा किंवा त्रास नाहीत तर सहज अपघाताने, हेतू नसताना घडलेल्या आहेत त्या कधी ही कोणाबरोबर होऊ शकतात. त्यांना क्षुल्लक प्रतिक्रिया देऊन विसरून पुढे जायचं असतं. हे ज्यांना कळत नाही ते विनाकारण मनस्ताप देतात आणि स्वतःला करून घेतात.*
*आपला चांगुलपणा हा दुबळेपणा ठरू नये किंवा वाईट प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळू नये म्हणून आपण ओरडायला शिकलेलो आहोतच,पण प्रसंग ओळखण्याच तारतम्य असलंच पाहिजे,त्यासाठी माणसं ओळखून प्रतिक्रिया देण्याची परिपक्वता असली पाहिजे. हाच वेळ वाचवण्याचा आणि मनःशांतीचा मार्ग आहे*.
*एका तरुण मुलाने एका मासिकात न विसरता येणारा प्रसंग या सदरात एक घटना लिहिली होती ती जशीच्या तशी आठवतेय. त्या मुलाने लिहिलं होतं की,*
*"मी काल भाजी आणायला मंडईत गेलो होतो खूप गर्दी होती. मित्र गाडीवर बाहेर थांबला होता त्याने घाई केल्याने मी पळत बाहेर पडू लागलो आणि एका समवयस्क मुलीला धक्का लागला. तिची पिशवी खाली पडून भाजी चौफेर उडाली. झालं…मला घाम फुटला*.
*आता "दिसत नाही का पासून … "*
*मला मनातल्या मनात सारं ऐकू आलं. आजूबाजूचं कोणी आता मला एखादी थोबाडीत मारेल असंही वाटून गेलं . पण ती मुलगी शांतपणे भाजी गोळा करू लागली. तिने पिशवी भरली आणि निघून गेली. एका मोठ्या संकटातून वाचल्याचा अनुभव त्याला आला,त्या मुलीचे त्याने आभारही मानले होते*.
*खरंच गाडी चालवताना समोरचा चुकला,जरासा धक्का लागला तर आपण शिव्या दिल्याच पाहिजेत का?*
*कार्यालयात,घरात,कोणाच्या हातून काही पडलं,फुटलं, नुकसान झालं तर माणसापेक्षा वस्तू मोठी असते का*?
*हे आपल्याकडून ही होऊ शकतं! हा एकच विचार केला तर आपल्याला समोरचा माणूस समजून घेता येतो आणि हसत पुढे जाता येतं.*
🙏 *प्रा.सतीश साठे*🙏
🌷🌷 शुभ प्रभात 🌷🌷