*परिवर्तन स्वत: पासून..!*
आपल्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या घटनांपेक्षा वाईट घटनांच आपल्या जास्त लक्षात राहतात.
आयुष्यात आलेले दुःखद प्रसंग,घडलेले अपमान आपण आयुष्यभर लक्षात ठेवतो आणि कधी कधी त्या विचारात इतकं गुरफटतो,की त्या विचारांन त्रास व्हायला लागतो.या घटना,हे दुःख निर्माल्य जसं गंगार्पण करतो ना,तसं गंगार्पण करता येणं गरजेचं आहे.नव्हे ते आलं पाहिजेचं.
बघा ना,म्हणजे ताज्या फुलांच आपल्याला किती कौतुक असतं.ती देवाच्या पायावर वाहिली तर त्याचा खूप आनंद होतो.घेतांना ती आपली असतात.पण देवाला वाहिली कि ती त्याची होतात. खरंतर,किती शांतपणे स्वीकारतो आपण हे सगळं.. अगदी आल्पीत्त होतो.म्हणजे,ज्याचं होतं त्याला दिलं.हा भाव फक्त मनात असतो.आणि त्या फुलांची ओढ संपलेली असते.मग काल वाहिलेली फुलं आज शिळी होतात.. त्याचं निर्माल्य होते.मग निरीच्छ मनाने आपण ती उचलतो आणि गंगार्पन करतो.त्या फुलांप्रती आता आपला कुठलाही मोह नसतो,अपेक्षा नसते किंवा आता मी हे फुलं कशी सोडू हा प्रश्नही नसतो.आणि पुन्हा त्यांची आठवण सुद्धा होत नाही.अगदी असचं,आपली दुःख त्याच्या चरणावर वाहून मन शांत केलं पाहिजे.आतापर्यंत जी माझी दुःख होती.ती आता त्याची झाली.त्याचा कसला विचार करायचा आणि कालची दु:ख ती तर आज निर्माल्य झाली.त्याचा मोहच नाही धरायचा आणि त्याला कवटाळून बसायचंही नाही.
कवटाळून ठेवली की शिळ्या फुलांप्रमाणे ती सडायला लागतात,मन पोखरायला लागतात.म्हणून जोपर्यंत ती निर्माल्य आहेत,तोपर्यंत गंगार्पण करून मोकळं व्हायचं.
बघा ना,धान्यांची पेरणी करतांना जमिनीची कशी मशागत करतात,तसचं मनामध्ये आनंद आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या शांततेसाठी मनाची साफसफाई करणे गरजेचे आहे.तेव्हा मनाची साफसफाई करूया आणि तिथे आनंद पेरूया.तो शतपटीने उगवतो,त्याची जोपासना करूया.
त्याचा परतावा म्हणून शांतता मिळते आणि ही शांतता आपलं जीवन समृद्ध करते.
*प्रा.सतीश साठे*
*खेड (रत्नागिरी)*
🙏 *शुभ सकाळ* 🙏