केले कुणास्तव ते किती,
हे कधी मोजू नये,
होणार त्याची विस्मृती,
त्याला तयारी पाहिजे.
डोक्यावरी जे घेऊनी
आज येथे नाचती,
घेतील ते पायातळी;
त्याला तयारी पाहिजे.
सत्यास साक्षी ठेवुनी
वागेल तो, बोलेल जो,
तो बोचतो मित्रांसही!
त्याला तयारी पाहिजे.
पाण्यामध्ये पडलास ना?
पाणी कसेही ते असो-
आता टळेना पोहणे;
त्याला तयारी पाहिजे.
सुखात सर्व सोबती
दुःखात ना कोणती
समोर जाण्या एकटा
त्याला तयारी पाहिजे
तोंडावर गोड जे बोलती
पाठीमागे निंदा करीती
तोंड देण्या निंदकास
त्याला तयारी पाहिजे
~विंदा करंदीकर
ही कविता पचवली की
आयुष्य जमलंच !!