वाचन सुभाषिते



*वाचन सुभाषिते*
1)वाचनाची सुप्तशक्ती तुमचं आयुष्य अनेक प्रकारे समृद्ध करते.
*बर्क हेजेस*.
2)सर्वसाधारणपणे एक चांगलं पुस्तक प्रत्येक खय्राखुय्रा महान व्यक्तीच्या यशाचा पाया असतो.
*राॅय एल.स्मिथ*.
3)पुस्तके ही फक्त प्रेरणा देण्यासाठीच असतात.
*राल्फ ईमर्सन*.
4)पुस्तके विचारप्रसाराचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे.
*जाॅर्ज बिल*.
5)पुस्तांशिवाय खोली म्हणजे आत्मा नसलेलं शरीर. 
*सिसेरो*.
6)मी सुखाचा शोध घेत होतो,तो शेवटी मला मिळाला छोट्याशा पुस्तकात.
*थाॅमस केंपिस*.
7)तुमच्या वेळेचा सदुपयोग तुम्ही इतरांनी लिहिलेले वाचण्यात घालवा.त्यामुळे इतरांना पडलेले कष्ट तुम्हाला पडणार नाहीत.
*साॅक्रेटिस*.
8)काही पुस्तके चाखायची असतात.काही गिळायची असतात.काही मात्र पचवायची असतात.
*फ्रान्सिस बेकन*.
9)एका चांगल्या बँकेपेक्षाही अधिक संपत्ती एका पुस्तकात असते.
*राॅय एल स्मिथ*. 
10)माझ्यापेक्षा तू श्रीमंत कधीच नसशील, कारण माझ्याकडे वाचून दाखवणारी आई होती.
*अॅबीगेल व्हॅन ब्यूरेन*.
#######$$$#######