१२ वी कला नंतरच्या सेवा संधी

      १२ वी कला नंतरच्या सेवा संधी
कला शाखेच्या विद्यार्थ्यांना करियरचे असंख्य पर्याय, अनेक क्षेत्रात आहेत दर्जेदार संधी
      कला शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करियरबद्दल लोकांच्या मनात बऱ्याच शंका असतात. तसेच कला शाखेचे विद्यार्थी देखील बऱ्याचदा इतर शाखेतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत स्वतःला कमी समजतात. पण कला शाखेचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील इतर असंख्य क्षेत्रात करियरच्या शेकडो संधी उपलब्ध आहेत. त्या संधी गाठण्यासाठी योग्य कोर्ससची निवड करणे गरजेचे ठरते. चांगली नोकरी मिळवण्यासाठी उपयोगी ठरतील अशा कोर्सेसबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 
१.वकील व्हा -
       कला शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने कायद्याचे शिक्षण घेण्याचा पर्याय निवडतात. त्यासाठी एलएलबी अभ्यासक्रम देशातील अनेक नामांकीत विद्यापीठांतर्फे शिकवण्यात येतो आणि या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. यामध्ये तुम्ही सीएलएटी परीक्षेची तयारी देखील करू शकता, त्यानंतर तुम्हाला देशातील टॉप लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल.
२.फॅशन आणि टेक्सटाईल डिझाइन -
     जर तुम्हाला या क्षेत्राची आवड असेल तर तुम्ही दोन वर्षांचा पीजी कोर्स देखील करू शकता. तसेच या विषयात 1 वर्षाचा डिप्लोमा आणि 2 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम देखील आहे. मात्र कोर्सबाबत प्रत्येक संस्थेचा स्वतःचा वेगळा निकष असतो.
३.शिक्षक -
     शिक्षक होणे हा पर्याय कला शाखेच्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या यादीत प्रथम क्रमांकावर असतो. यासाठी तुम्हाला बीएडला प्रवेश घ्यावा लागेल किंवा एमए केल्यानंतर नेट परीक्षा क्लीअर करावी लागेल. बीएड केल्यावर तुम्ही शाळांमध्ये शिकवू शकता, नेट परीक्षा पास झाल्यावर तुम्ही महाविद्यालयात शिक्षक पदांसाठी अर्ज करण्यास पात्र असाल.
४.हॉटेल मॅनेजमेंट -
    हॉटेल उद्योगात देशातच नव्हे तर परदेशातही स्कोप आहे. हॉटेल उद्योगाशी संबंधित अनेक अभ्यासक्रम आर्ट्स ग्रॅज्युएट असणाऱ्या विद्यार्थ्यांना करता येतात. या अभ्यासक्रमाचा प्रत्येक संस्थेचा स्वतःचा वेगळा निकष असतो. या क्षेत्रात तुम्ही आर्ट्स ग्रॅज्युएट ,डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेन्ट, एमबीए टूरिझम इत्यादी करू शकता.
५.सरकारी नोकरीची तयारी -
     आजकाल प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी आहे आणि आपण यूपीएससी किंवा एसएससी नोकरीसाठी अर्ज करू शकता किंवा आपण कोणत्याही इतर सरकारी संस्थेच्या नोकरीसाठी तयारी करू शकता. जर तांत्रिक आणि विशेष क्षेत्रातील नोकऱ्या सोडल्या तर बहुतेक सरकारी नोकरीसाठी कोणत्याही फिल्डमधील पदवी चालते. 
या व्यतिरिक्त, इतर फील्ड्स आणि अभ्यासक्रम 
- पत्रकारिता 
- ॲनिमेशन 
- विदेशी भाषा तज्ञ 
- एमबीए 
- इव्हेंट मॅनेजमेंट 
- आणि फॅशन उद्योग
- ग्राफिक डिझाइनर 
- शेअर मार्केट
आर्ट्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रमुख सेवा संधी -
१. पारंपरिक पदवी BA
२.BA नाट्यशास्त्र
३. BA म्युझिक
४.BA नृत्यशास्त्र
५. BA पत्रकारिता
६. बी बी एम
७. बी बी एस
८. बी एफ ए
९. बी एस डब्ल्यू
१०. लँग्वेजेस
११. ग्रामीण सेवा
१२. व्होकेशनल
१३. कोऑपरेशन
१४. लोकसंख्याशास्त्र
१५. कायदा (एलएलबी)
१६. शिक्षणशास्त्र (डीएड)
१७. बी. डी.(बॅचलर ऑफ ड्रामा)
१८. शारीरिक शिक्षण (बीपीएड)
१९. बी एम एस (बॅचलर ऑफ म्युझिक)
२०. बी डी ई एस (बॅचलर ऑफ डिझाईन)
२१. बी लीब (बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स)
२२. बी व्ही ए (बॅचलर ऑफ व्हीजुअल आर्ट्स)
२३. बी एम सी (बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन)
२४. बी लिट/ बी ओ एल (बॅचलर ऑफ लिटरेचर)
२५. बी डी ए (बॅचलर ऑफ डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन)
२६. बी बी एम
२७. बी एफ ए
२८. ॲनिमेशन
२९. मॅनेजमेंट
३०. डिझाईन
३१. फोटोग्राफी
३२. वास्तुशास्त्र
३३. पत्रकारिता
३४. कायदा (विधी)
३५. इव्हेंट मॅनेजमेंट
३६. इंटेरियर डिझाईन
३७. फॅशन डिझाईन
३८. फर्निचर डिझाईन
३९. फुटवेअर डिझाईन
४०. रिटेल मार्केटिंग
४१. फॅशन कम्युनिकेशन
४२. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी
४३. वस्त्र उद्योग तंत्रज्ञान
४४. योग विद्या शास्त्र
४५. जीडीसी अँड ए
४६. सौंदर्यशास्त्र (कॉस्मेटोलॉजी)
४७. स्वास्थ्य विषयक अभ्यासक्रम
४८. बी ए (मास कम्युनिकेशन)
४९. आय आय टी
५०. पोलीस (जिल्हा पोलीस भरती, तुरुंग शिपाई भरती, राज्य राखीव पोलीस भरती SRP, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स CISF, सेंट्रल रिझर्व पोलीस CRPF, केंद्रीय राखीव पोलीस दल, असिस्टंट सब इन्स्पेक्टर स्टेनोग्राफर आणि कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियल.
५१. माहिती तंत्रज्ञान (संगणक क्षेत्रातील अनेक कोर्सेस)
५२. मेडिकल ट्रान्सस्क्रीप्शन 
५३. दहावीनंतरचे बारा फाउंडेशन कोर्सेस
५४. बारावीनंतरचे 13 फाउंडेशन कोर्स
५५. बी. आर्च.(बॅचलर ऑफ आर्किटेक्चर) वास्तुविद्या
५५. शेती विषयक ९ कोर्सेस (इतर ३९ कोर्सेस)
५६. अग्निशामक दलातील चार कोर्सेस
५७. भारतीय रेल्वेतील पाच कोर्सेस ( १५ विविध अभ्यासक्रम)
५८. भारतीय संरक्षण दलातील अनेक पदांवर सेवा संधी
५९. वनक्षेत्रातील पाच कोर्सेस
६०. व्यापारी नौदलातील सेवा संधी
६२. पदवी प्राप्त केल्यानंतर विविध स्पर्धा परीक्षा
६३. विमा, शेअर मार्केट, म्युच्युअल फंडामधील सेवासंधी
६४. स्त्रियांसाठीचे 19 विविध कोर्सेस व सेवासंधी
६५. विविध स्वयंरोजगार
                - श्री.लोखंडे एच.आर.